ब्रीद वाक्य

पारदर्शक प्रशासन, समान न्याय, सर्वांगीण विकास

दृष्टी आणि ध्येय

दृष्टी (Vision)

“सशक्त, स्वावलंबी आणि समृद्ध गाव निर्माण करणे, जिथे प्रत्येक ग्रामस्थाला समान संधी, गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम आरोग्यसेवा आणि सुरक्षित वातावरण मिळेल. पारदर्शक व लोकसहभागी प्रशासनाच्या माध्यमातून गावाला आदर्श, प्रगतिशील आणि सर्वांगीण विकासाचे केंद्र बनवणे.”

ध्येय (Mission)

“ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून पारदर्शक व कार्यक्षम प्रशासन उभारणे आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे. शिक्षण, क्रिडा, आरोग्य, स्वच्छता, शेती आणि पायाभूत सुविधा यांचा विकास साधून प्रत्येक ग्रामस्थांचे जीवनमान उंचावणे तसेच गावाला आदर्श, सक्षम व स्वावलंबी बनवणे.”

परिचय

जनगणना 2011 नुसार, जुनेखेड (June Khed) या गावाचा स्थान कोड किंवा गाव कोड 568385 आहे. या गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ ६५७ हेक्टर आहे आणि या ठिकाणाचा पिनकोड 416313 आहे. उरण इस्लामपूर हे या गावाजवळील सर्व प्रमुख आर्थिक उपक्रमांसाठीचे जवळचे शहर असून ते अंदाजे १५ किलोमीटर अंतरावर आहे. स्थानिक स्वराज्याच्या दृष्टीने, जुनेखेड गावाचे प्रशासन हे सरपंच या निवडून आलेल्या ग्रामपंचायत प्रमुखाकडे असते. हे प्रशासन भारताच्या घटनेनुसार आणि पंचायतराज कायद्यानुसार कार्य करते. गावातील नागरी सेवा, स्वच्छता, पाणीपुरवठा, तसेच विकासकामे या स्थानिक प्रशासनाच्या जबाबदारीत येतात. निवडणुकीच्या दृष्टीने हे गाव इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आणि हातकंगले लोकसभा मतदारसंघात येते.

  • गावाचे नाव : जुनेखेड
  • तालुका : वाळवा
  • जिल्हा : सांगली
  • राज्य : महाराष्ट्र
  • पिन कोड: ४१६३१३
  • गांवचे ग्राम दैवत : श्री भैरवनाथ मंदिर
  • प्रमुख भाषा : मराठी
  • मुख्य व्यवसाय : शेती (ऊस, भात, भुईमूग, सोयाबीन, गहू, डाळी, रताळे आणि भाजीपाला)
  • नदी/भूगोल : कृष्णा नदी खोरे
  • बाजार वार : रविवार
  • पंचायत समिती मतदार संघ : ताकारी
  • जिल्हा परिषद मतदार संघ : बोरगाव
  • विधानसभा मतदार संघ (क्र. २८३) : इस्लामपूर
  • लोकसभा मतदार संघ (क्र. ४८) : हातकणंगले
  • लोकसंख्या (२०११ पासून जनगणना झाली नसल्याने अंदाजे आकडे)
    • एकूण लोकसंख्या : अंदाजे 3,200 – 3,400
    • पुरुष : सुमारे 1,600+
    • स्त्रिया : सुमारे 1,600+
  • गावात प्रवेश करणारे प्रमुख रस्ते :
    • जुनेखेड ते बोरगाव (राज्य महामार्ग)
    • जुनेखेड ते इस्लामपूर रस्ता नवेखेड मार्गे (प्रमुख जिल्हा मार्ग)
    • जुनेखेड ते वाळवा रस्ता (इतर जिल्हा मार्ग)
    • जुनेखेड ते पुनदी पूल रस्ता (इतर जिल्हा मार्ग)
    • मसुचीवाडी ते जुनेखेड रस्ता (इतर जिल्हा मार्ग)
  • भौगोलिक माहिती :
    • जुनेखेड हे गाव महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वसलेले आहे.
    • हे गाव कृष्णा नदीच्या खोऱ्यात असल्याने सुपीक जमीन व शेतीप्रधान अर्थव्यवस्था आहे.
    • गांवचे क्षेत्रफळ : १०२४ हेक्टर ४१ आर
    • पैकी लागणीलायक : ९४१ हेक्टर ८६ आर
    • पोट खराब व पड : १० हेक्टर ९५ आर
    • नदी व नाले या खालील क्षेत्र : २७ हेक्टर ९१ आर
    • शासकीय व गायरान क्षेत्र : १२ हेक्टर ८९ आर
    • गावठाण क्षेत्र : १८ हेक्टर ६९ आर
    • रस्ते व मार्ग खालील क्षेत्र : ११ हेक्टर ५४ आर
  • स्थान (नकाशा / GPS coordinates) :
    • अक्षांश (Latitude): 17.0575° N
    • रेखांश (Longitude): 74.4200° E
    • उंची (Elevation): अंदाजे 560 मीटर (समुद्रसपाटीपासून)

गावाचा ऐतिहासिक वारसा

स्वातंत्र्यलढ्यातील योगदान

जुनेखेड गावाने स्वातंत्र्य लढ्यामध्ये विशेष योगदान दिले. या गावाचे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याशी घनिष्ठ नाते होते. या गावाला पत्री सरकार चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जात असे. पत्री सरकारची पहिली जाहीर सभा हि या गावामध्ये झाली होती. गावातील स्वतंत्र सैनिकांनी व ग्रामस्थांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांना स्वातंत्र्यलढ्यात सहकार्य केले होते. गावातील स्वातंत्र्यसैनिक रंगराव तुकाराम (केरू) पाटील, शामराव दत्तू पाटील, भगवान रामचंद्र पाटील यांच्यासह अनेक तरुणांनी सत्याग्रह, आंदोलन आणि स्वदेशी चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवला. विदेशी माल बहिष्कार व चरख्याचा प्रसार गावात झाला. काहींनी तुरुंगवास भोगला तर काहींनी आर्थिक योगदान दिले.

सांस्कृतिक वारसा

जुनेखेड हे प्रसिद्ध रामकवी यांचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यांच्या रचना व कविता यांना विशेष लोकमान्यता लाभली आहे. या कवितांचे गायन पट्टे बापूराव स्वतः करत असत, त्यामुळे या काव्यपरंपरेला अधिक प्रसार व लोकप्रियता मिळाली. गावाला लाभलेला हा साहित्यिक व सांस्कृतिक वारसा आजही ग्रामस्थांच्या अभिमानाचा भाग आहे. शेतकरी संख्या जास्त असलेने शेतीशी सल्ग्नित सण व उत्सव (बैलपोळा, नागपंचमी, दसरा, दिवाळी) तसेच गणेशोत्सव, रंगपंचमी हे मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.

सामाजिक वारसा

पोलीस दलामध्ये केलेल्या विशेष कार्याबद्दल श्री. आनंदराव केशव शिंदे यांना राष्ट्रपती पदक मिळवले. श्री.राजाराम गुंडा जाधव यांना पंतप्रधान कार्यालयाद्वारे समाज सेवक म्हणून सन्मानपत्र देणेत आले.

क्रीडा वारसा

मौजे खेड गावाला समृद्ध क्रीडा परंपरा लाभली आहे. येथेच जन्मलेल्या गणपत खेडकर पैलवान यांनी आपल्या कुस्तीच्या अद्वितीय कौशल्याने महाराष्ट्र क्रीडा इतिहासात अढळ स्थान मिळवले. ते महाराष्ट्र केसरी हा किताब दोनदा जिंकणारे पहिले डबल महाराष्ट्र केसरी ठरले. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे मौजे खेड गावाचे नाव राज्यभरात आणि देशभरात गौरवाने घेतले जाते. स्फूर्ती कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाने कब्बड्डी या खेळ प्रकारात गावाचे नाव राज्यपातळीवर नेले.

मंदिरे, ऐतिहासिक स्थळे, सण-उत्सव

  1. श्री खडकेश्वर महादेव मंदिर
  2. श्रीक्षेत्र भैरवनाथ -नरसिंह मंदिर
  3. बिरोबा व बाळकृष्ण मंदिर
  4. पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव रामेश्वर मंदिर
  5. श्री जगदीश पुरी महाराज आणि शिष्य यांची जिवंत समाधी मठ
  6. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर
  7. हनुमान
  8. वेताळबा
  9. नाईकबा
  10. सिद्धनाथ मंदिर

पायाभूत सुविधा

रस्ते व वाहतूक सुविधा

  • प्रमुख व अंतर्गत पक्के रस्ते
  • सार्वजनिक वाहतूक थांबे – बस स्थानक

पाणीपुरवठा व्यवस्था व स्त्रोत

  • नदी, विहिरी, बोअरवेल
  • पिण्याच्या पाण्याची टाकी व पाणी शुद्धीकरण यंत्रणा

वीजपुरवठा

  • सरकारी व खाजगी इमारतींवर तसेच शेतीपम्पासाठी सौरऊर्जेची व्यवस्था
  • घरगुती वीज कनेक्शन
  • शेतासाठी विजेची सोय
  • सार्वजनिक दिवे (स्ट्रीट लाईट)

शिक्षण सुविधा

  • अंगणवाडी क्रमांक ९६ व ९७
  • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा – स्थापना १९०४ (२०२५ साली या शाळेला १२१ वर्ष पूर्ण झाली)
  • माध्यमिक शाळा – क्रांतीवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी विद्यालय नवे- जुनेखेड.

आरोग्य सुविधा

  • प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) / उपकेंद्र
  • खाजगी दवाखाने-३
  • औषधालय-२

संपर्क साधने

  • टपाल कार्यालय
  • इंटरनेट, मोबाईल नेटवर्क सुविधा
  • सार्वजनिक दूरध्वनी केंद्र

स्वच्छता व सांडपाणी व्यवस्था

  • बंदिस्त गटारी
  • सार्वजनिक मुताऱ्या व स्वच्छता गृह
  • घनकचरा संकलन व व्यवस्थापन युनिट
  • प्लास्टिक संकलन व्यवस्था
  • सांडपाणी व्यवस्थापन युनिट

कृषी व सिंचन सुविधा

  • नदी, विहरी व कुपनलिका
  • शेतीसाठी सहकारी पाणीपुरवठा संस्था व खाजगी व्यवस्था
  • शेतीपम्पासाठी सौरऊर्जेची व्यवस्था
  • सहकारी सेवा सोसायटी – २
  • खत/बियाणे केंद्र – २

सामाजिक-सांस्कृतिक सुविधा

  • ग्रामपंचायत कार्यालय व सभागृह
  • सामुदायिक सभामंडप – ३
  • समाज मंदिर -१
  • देवालये/धर्मस्थळे – ११
  • खेळाचे मैदान

आर्थिक सुविधा

  • पोस्ट ऑफिस सुविधा (IPBS)
  • जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा जुनेखेड.
  • बाजारपेठ/साप्ताहिक बाजार
  • सहकारी सेवा सोसायटी – २

उद्दिष्टे आणि कार्ये

ग्रामपंचायतीची उद्दिष्टे

ग्रामविकास साधणे

गावातील सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधणे.

मूलभूत सुविधा पुरवणे:

स्वच्छ पाणी, रस्ते, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता इत्यादी मूलभूत सुविधा उपलब्ध करणे.

लोकसहभाग वाढवणे:

ग्रामस्थांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून लोकशाही मजबूत करणे.

सामाजिक व आर्थिक उन्नती:

ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्य, शेती, उद्योग आणि रोजगार यामध्ये सुधारणा करणे.

पर्यावरण संरक्षण:

वृक्षलागवड, जलसंधारण आणि स्वच्छता मोहिमा राबवून पर्यावरणाचे रक्षण करणे.

पारदर्शक प्रशासन:

शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून लोकांसमोर जबाबदारीने प्रशासन चालवणे.

ग्रामपंचायतीची कार्ये

प्रशासकीय कार्ये

  1. ग्रामसभा बोलावणे व ठराव मंजूर करणे
  2. ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प तयार करणे
  3. कर व शुल्क वसूल करणे (उदा. घरपट्टी, पाणीपट्टी)
  4. गावातील नोंदी ठेवणे (जन्म, मृत्यू, विवाह इ.)

विकासात्मक कार्ये

  1. ग्रामविकास योजना तयार करणे
  2. रस्ते, गटारे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे
  3. शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र यांच्या सुविधांचा विकास करणे
  4. कृषी व पशुसंवर्धन संबंधित योजना राबवणे

सामाजिक कार्ये

  1. स्वच्छ भारत अभियान, नशाबंदी, साक्षरता मोहिमा राबवणे
  2. महिलांचे व बालकल्याण कार्यक्रम आयोजित करणे
  3. सामाजिक सौहार्द आणि एकात्मता राखणे

पर्यावरण व आरोग्य कार्ये

  1. पाण्याचे शुद्धीकरण व जलसंधारण उपक्रम
  2. वृक्षलागवड व स्वच्छता अभियान
  3. घनकचरा व्यवस्थापन
  4. रोगप्रतिकार व आरोग्य शिबिरे आयोजित करणे

शैक्षणिक कार्ये

  1. प्राथमिक शिक्षण प्रोत्साहन
  2. शाळांची दुरुस्ती व आवश्यक साहित्य पुरवणे
  3. प्रौढ साक्षरता अभियान राबवणे