जुनेखेड (ता. वाळवा, जि. सांगली) हे गाव प्राचीन इतिहास असलेले आहे. गावातील खडकेश्वर मंदिरावरून या वस्तीचे नाव पूर्वी मौजे खेड असे पडले. पुढे कालांतराने कृष्णा नदीला वारंवार येणाऱ्या महापुरांमुळे या गावाचे विभाजन इ.स. १९६७ साली होऊन जुनेखेड आणि नवेखेड अशी प्रशासकीय विभागणी झाली. त्यामुळे येथील मूळ वस्तीला जुनेखेड म्हणून ओळख प्राप्त झाली. तथापि, इ.स. १९५५ पासून आजपर्यंत महसुली नोंद मौजे खेड अशीच आहे.
जुनेखेड हे महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे. हे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशात आणि पुणे विभागात येते. हे जिल्हा मुख्यालय सांगलीपासून उत्तरेस सुमारे ३८ किमी आणि वाळवा-इस्लामपूरपासून १२ किमी अंतरावर आहे. राज्याची राजधानी मुंबईपासून सुमारे ३१४ किमी अंतरावर आहे. या गावाचा पिन कोड ४१६३१३ आहे. जुनेखेड गावच्या शेजारी नवेखेड (१ किमी), बोरगाव (५ किमी), वाळवा (५ किमी), पुणदी (२ किमी), मसुचीवाडी (३ किमी), नगराळे (३ किमी), वाळवा (५ किमी), सतापेवाडी (५ किमी) हि गावे आहेत व उरूण ईश्वरपूर हे जवळचे शहर आहे.
पारदर्शक प्रशासन, समान न्याय, सर्वांगीण विकास
“सशक्त, स्वावलंबी आणि समृद्ध गाव निर्माण करणे, जिथे प्रत्येक ग्रामस्थाला समान संधी, गुणवत्तापूर्ण शिक्षण, उत्तम आरोग्यसेवा आणि सुरक्षित वातावरण मिळेल. पारदर्शक व लोकसहभागी प्रशासनाच्या माध्यमातून गावाला आदर्श, प्रगतिशील आणि सर्वांगीण विकासाचे केंद्र बनवणे.”
“ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून पारदर्शक व कार्यक्षम प्रशासन उभारणे आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे. शिक्षण, क्रिडा, आरोग्य, स्वच्छता, शेती आणि पायाभूत सुविधा यांचा विकास साधून प्रत्येक ग्रामस्थांचे जीवनमान उंचावणे तसेच गावाला आदर्श, सक्षम व स्वावलंबी बनवणे.”