ऑनलाइन दाखले

आपल्या ग्रामपंचायतीने ग्रामस्थांसाठी ऑनलाइन दाखले देण्याची सुविधा सुरु केली आहे. दाखला मागणी अर्ज टॅब वरती क्लिक केल्यानंतर अर्जदाराने आपली माहिती आणि अर्जाचे नाव भरायचे आहे तसेच अर्जदाराने आपला आधार कार्ड फोटो अपलोड करायचा आहे. यानंतर अर्जाशेजारी असलेल्या क्यू. आर. कोड. वरती लोकसेवा पुरविण्यासाठी निर्धारित शुल्क (खालील टेबल मध्ये दिल्याप्रमाणे) भरून त्याचा स्क्रीन शॉट (यु. पी. आय. ट्रानजिक्शन आयडी सहित) अपलोड करायचा आहे. अर्जदाराने ऑनलाइन दाखला मागणी अर्ज केल्यानंतर विहित केलेल्या कालमर्यादेमध्ये (खालील टेबल मध्ये दिल्याप्रमाणे) दिलेल्या मोबाईल नंबरच्या व्हाट्सअॅपवरती पाठवला जातो.

· • ग्रामपंचायत कडून देण्यात येणारे दाखले लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा व लोकसेवा पुरविण्यासाठी निर्धारित शुल्क:-

अ.नं. सेवेचे नाव लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा लोकसेवा पुरविण्यासाठी निर्धारित शुल्क पद निर्देशित अधिकारी प्रथम अपिलीय प्राधिकारी द्वितीय अपिलीय प्राधिकारी
जन्म नोंद दाखला ७ दिवस २०/- ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी
मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २०/- ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी
विवाह नोंद दाखला ७ दिवस २०/- ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी
दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी
ग्रामपंचायत येणे बाकी दाखला ५ दिवस २०/- ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी
नमुना ८ चा उतारा ५दिवस २०/- ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी
निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी